OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Monday, December 6, 2010

लिंबू-चहा

लिंबू-चहा


प्रकार:
पेय
गरम
किती जणांसाठी: १
शिजवण्याची पद्धत: उकळणे, गाळणे
पौष्टिकता:
क्षार
जीवनसत्त्वे ब, क
कॅफीन, फ्लॅव्होनॉईड्स  
अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्स (कटेचिन्स)
वेळ:
पूर्वतयारीचा:
२ मि
वाढण्याचा:
१ मि

पाककृतीचा:
३ मि
खाण्याचा:
१० मि


आता आपण लिंबू-चहा करायला शिकूया.
हा कोर्‍या चहाचा प्रकार हवामानाप्रमाणे गरम किंवा थंड पिता येतो. एकट्याने निवांत आस्वाद घेत किंवा मित्रांसोबत (असा चहा आवडणार्‍या) समारंभपूर्वक घेण्याचे हे पेय आहे.
पूर्वतयारी:
पण आपल्याला कोरा चहा आवडतो का? घेऊन तर बघू. हाही करायला (म्हटलं तर) अगदी सोपा आहे.
नुसत्या चहाबाजांपेक्षाही चहाच्या चाहत्यांना हा नक्की आवडतो.
तयारी:
आपल्याला थोडं पाणी; ते ठेवायला छोटं पातेलं, झाकायला ताटली आणि तापवायला विस्तव (शेकोटी, चूल, स्टोव्ह, गॅस, इ.); थोडी चहा-पत्ती (शक्यतो हिरवा चहा. तो न मिळाल्यास आपल्याकडे सहसा मिळत नाहीच - काळ्या चहांपैकी ओपी – Orange pecco / pekoe, बीओपी broken orange pecco किंवा सीटीसी सुद्धा चालेल. डस्ट नको), लिंबू आणि साखर; गाळणं आणि चहा भरून घ्यायला/द्यायला कप-बशी (किंवा मग) लागेल.
या सर्व गोष्टी योग्य वेळी हाताशी येतील अशी मांडणी करून पाककृतीला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला फक्त एक कपच चहा करणार आहोत. कारण त्याचा प्रयोग आपल्याला स्वतःवरच करायचा आहे. आपल्याला आवडल्याशिवाय व त्याचं महत्त्व पटल्याशिवाय आपण इतरांना कसा देणार?
पाककृती:
आपण प्रथम गॅस पेटवून त्यावर पातेले ठेवू. त्यात एक कप पाणी आणि एक चमचा साखर घालून पाण्याल उकळी फुटायची वाट बघत (हातांची घडी घालून) स्वस्थ उभे राहू. पाण्याला उकळी फुटताच त्यात एक सपाट चमचाभर ओपी चहा-पत्ती टाकून लगेच एका हाताने गॅस बंद करून दुसर्‍या हाताने ताटली पातेल्यावर झाकण ठेवू (दुसरा पर्याय म्हणजे किट्लीमधे चहा-पत्ती टाकून त्यावर उकळते पाणी ओतणे व किटलीचे झाकण लावणे).
आता कपात चतकोर लिंबू पिळून (लिंबू कापून पिळणे अर्धं मिनिट) दोन मिनिटे थांबू (त्यासाठी अर्थातच खोलीत दहा वेळा येरझारा). आता चहा कपात गाळून घेऊ.
कौशल्य:
·         चहा-पत्ती घातल्यानंतर चहा उकळायचा नाही.
·         अडीच मिनिटांपेक्षा जास्त वेळ मुरू द्यायचा नाही. म्हणजे तो कडू व तुरट होणार नाही आणि निवणारही नाही.
·         जास्त कडक चहा हवा असल्यास चहा-पत्तीचे प्रमाण थोडे वाढवावे पण अडीच मिनिटांपेक्षा जास्त वेळ मुरू देऊ नये.
आस्वाद:
आता स्वस्थ बसून, डोळे मिटून प्रथम सावकाश वास घेऊ. मग थोडा फुंकून चहाचा पहिला घोट हळूच ओढून तो जिभेवर पसरवत त्याचा आस्वाद घेऊ. वाऽऽ! वाऽऽऽ!!
चिंतन:
लिंबू-चहा 
·         स्वादामधे हा चहा लाजवाब. रंग, चव आणि स्वादाच्या दृष्टीने चहाची खरी लज्जत या प्रकारे केलेल्या कोर्‍या चहातच आहे.
·         यात आपल्याला आलं, गवती चहा, पुदिना किंवा तुळशीची दोन पानं टाकता येतील.
·         साखर न घालताही हा छान लागतो.
·         यात आपण चवीपुरतं मीठही घालू शकतो.
·         आंबटपणासाठी लिंबाऐवजी संत्र्याचा, आवळ्याचा किंवा पेरूचा रस (धाडस करून बघा, अप्रतीम लागतो) घातल्यास त्याचा स्वाद वेगळाच येतो.
·         उन्हाळ्यात थंड चहा हवा असल्यास सकाळी करून (आपोआप) निवू द्यावा, दुपारी फ्रीजमधे ठेवावा व संध्याकाळी प्यावा (लिंबू आयत्या वेळी पिळावे).
·         संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर (आस्वाद) घेताना अधिक तरतरी व उत्साहासाठी थंड चहात आणखीही काही घालता येते. पुढच्या वेळी तसे करून बघू.

No comments:

Post a Comment