OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Thursday, December 2, 2010

चहा

Morning Tea

प्रकार:
पेय
गरम
किती जणांसाठी: १
शिजवण्याची पद्धत: उकळणे, गाळणे
पौष्टिकता:
क्षार
जीवनसत्त्वे ब, क
कॅफीन, फ्लॅव्होनॉईड्स
अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्स (कटेचिन्स)
वेळ:
पूर्वतयारीचा:
२ मि
वाढण्याचा:
१ मि

पाककृतीचा:
३ मि
खाण्याचा:
१० मि
   
इच्छा:

आपण प्रथम चहा करायला शिकूया.
पूर्वतयारी:
बहुधा सर्वांचीच पाककला शिकण्याची (जरूर म्हणून किंवा हौस म्हणून) सुरुवात चहा करायला शिकण्यापासून होते. दुसरं म्हणजे चहा करायला सर्वात सोपा (एक सार्वत्रिक गैरसमज). पण गाणं शिकण्याच आरंभ आणि शेवट जसा भूप (किंवा यमन) शिकण्यापासून भूपाला आळवण्यापर्यंत होतो तसंच चहा शिकण्याच्या बाबतीत म्हणता येईल.
पट्टीच्या चहाबाजांना चहा प्यायला मानसिक तयारी करायला लागत नाही. पण चहा बनवायला थोड्या आणि चहा करायला शिकायला (एकूणच पाककलेत शिरायला) मोठ्ठ्या मानसिक तयारीची आवश्यकता असते. चहाचे अनेक प्रकार आहेत. मनाची तयारी करून त्यांपैकी साधा (दूध घातलेला, गोड) चहा करायला आपण आत्ता शिकूया.
तयारी:
त्यासाठी आपल्याला थोडं पाणी आणि दूध; ते ठेवायला छोटं पातेलं, झाकायला ताटली आणि तापवायला विस्तव (शेकोटी, चूल, स्टोव्ह, गॅस, इ.); थोडी चहा-पावडर आणि साखर; गाळणं आणि चहा भरून घ्यायला/द्यायला कप-बशी (किंवा मग) लागेल.
या सर्व गोष्टी असल्याची खात्री करून आणि त्या योग्य वेळी हाताशी येतील अशी मांडणी करून (हे महत्त्वाचं आहे) मग पाककृतीला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला फक्त एक कपच चहा करणार आहोत. कारण त्याचा प्रयोग आपल्याला स्वतःवरच करायचा आहे.
पाककृती:
आपण प्रथम गॅस पेटवून त्यावर पातेले ठेवू. त्यात पाऊण कप पाणी आणि एक चमचा साखर घालून पाण्याल उकळी फुटायची वाट बघत (हातांची घडी घालून) स्वस्थ उभे राहू. पाण्याला उकळी फुटताच त्यात एक सपाट चमचाभर (नेहमीचा चमचा) चहा-पावडर टाकून दहा सेकंद उकळूया. (त्यासाठी मनात दहा आकडे सावकाश मोजू). नंतर एका हाताने गॅस बंद करून दुसर्‍या हाताने ताटली पातेल्यावर झाकण ठेवू.
कौशल्य:
आता तीन मिनिटे थांबू (त्यासाठी खोलीत पंधरा वेळा येरझारा घालू. तेवढाच जाताजाता व्यायाम). नंतर झाकण काढून त्यात पाव कप उकळते दूध घालू.
अरेऽऽ! दूध तापवायला ठेवलंच नव्हतं. आता कोमट चहा प्यायला लागणार.
आस्वाद:
आता चहा कपात गाळून घेऊ आणि स्वस्थ बसून, डोळे मिटून आपण केलेल्या पहिल्या चहाचा प्रथम सावकाश वास घेऊ. मग थोडा फुंकून, ओठ भाजून न घेता चहाचा पहिला घोट ह्ळूच ओढून तो जिभेवर पसरवत त्याचा आस्वाद घेऊ. वाऽऽ!!
चिंतन:
Evening Tea
कोमट तर झालाच, पण आपल्याला चहा यापेक्षा कमी-जास्त गोड, कमी-जास्त कडक हवा होता का? आपल्याला त्यामधे आलं, दालचिनी, लवंग, गवती चहा इत्यादीचा वास आवडतो का? पुढच्या वेळी तसा करून बघू.
पण पहिल्या वेळेच्या मानाने झकासच झाला.

4 comments:

  1. पहिल्या वेळेच्या मानाने झकासच

    ReplyDelete
  2. amazing!!! mi aswad gheu shakat nahi pan i can imagine. i liked the format and style of writing.

    ReplyDelete
  3. Chahamadhye khoop goshtincha swad masta lagto. For example... Jasmine tea, light BOP chahamadhe khanyache kevdyache aattar kinchit.... Velchi ghatlela chaha etc.

    ReplyDelete
  4. You have full liberty to use any flavor you like. but don't get ready-made flavored teas. You add flavoring ingredients while preparing tea. This gives freedom to add many in varying quantities according to your taste.

    ReplyDelete