OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Activities

1]Delicious Recipes for Weight Management




वाढणारे वजन हा सध्या अत्यंत काळजीचा व म्हणून जिव्हाळ्याचा  प्रश्न आहे. मग ते वाढते वजन’ दहा बारा वर्षांच्या मुलाचे असो, जेमतेम पस्तिशी गाठलेल्या त्याच्या आईचे असो किंवा चाळीशीतील त्याच्या बाबांचे असो. 
कॉलेजमध्ये अगदी सडपातळ असणारे आपण कधी गरगरीत झालो हेच आपल्याला कळत नाही. त्यालाच आपण आपल्याला नोकरीलग्नस्थैर्य अशा सगळ्याच गोष्टी मानवल्या असं म्हणतो. नंतर तर हवा खाल्ली तरी आपले वजन वाढते असा आपला गैरसमज होतो. 
मग आपण बीनश्रमाचे  झटपट उपाय शोधायला लागतो. त्यातच झटपट वजन कमी करण्याच्या वेगवेगळ्या जाहिरातीवेगवेगळे डाएट चार्ट आपल्याला सतत भुलवत असतात. आपण फक्त दोन (“खास वजन वाढणार्या लोकांसाठी” अशी जाहिरात केलेली) बिस्कीटे किंवा मोठी जाहिरात केलेले एखाद्या कंपनीने बनवलेले वजन कमी करण्यासाठीचे  खास पदार्थ खातो. त्याचा फायदा काहीच होत नाही. मग नेमके काय करावे हे  कळल्याने आपण अधीकच गोंधळतो. 
वाढत्या वजनामुळे धाप लागणेगुडघेदुखीकंबरदुखीडायबेटीसची शक्यताकोलेस्टेरॉल वाढणेब्लडप्रेशर  शेवटी हार्टचे दुखणे ह्या सर्व शक्यता डॉक्टरांकडे जाण्यापूर्वीच आपल्या मनात आलेल्या असतात. काही तक्रारी सुरूही झालेल्या असतात. ह्यावर उपाय म्हणून डॉक्टरने वजन कमी करा म्हणून सल्ला दिलाआहारतज्ञाने जेवण कमी करापिष्टमय पदार्थ कमी करातेलकट- तुपकट खाऊ नकाप्रोटिन्स वाढवावगैरे मार्गदर्शन करून आहाराचा चार्ट दिलापण हे सगळे व्यवहारातरोजच्या जेवणातकसे अंमलात आणावे हा प्रश्न तरीही सुटत नाही
मग टेन्शन वाढते. ते कमी करण्यासाठी आपण आणखी जास्त खात राहातो किंवा उपास,एक वेळ जेवणे अशा गोष्टी करतो. किंवा केवळ उकडलेल्या भाज्य़ा, कमी तेलाचे अत्यंत बेचव पदार्थ आपण खाऊ लागतो. अर्थात अशा पदार्थांमुळे खाण्याचे  पोट नीट भरल्याचे समाधान होत नाही. चिडचिड मात्र वाढते.  आपली रात्रीची झोप उडते. पोट रिकामे आहे म्हणून आपल्याला झोप येत नाही असा निष्कर्ष आपणच काढतो आणि रात्री दोन वाजता उठून फ्रीजमधले काहीतरी खात बसतो. थोडक्यात काय? सोपा वाटणारा प्रश्न अधिकाधीक बिकट होत जातो.
याचं खरं कारण म्हणजे वजन पूर्ववत आणायला जो वेळ  जातो   जे श्रम करावे लागतात त्यांची आपल्याला खूपच कटकट वाटते. पण सृष्टीचा साधा नियम आहे की पसारा वाढवायला कष्ट करावे लागत नाहीत पण तो आवरायला मात्र भरपूर कष्ट घ्यावे लागतत. हीच गोष्ट वजनालाही लागू आहे.
आता हे वजन वाढवायला कारणीभूत असणारी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपली बदललेली जीवनपद्धती. आपला बदललेला आहार, व्यायामाचा अभाव  कमी होत चाललेले कष्ट. 
ह्या पुस्तकात योग्य  संतुलित पण वजन कमी करणारा आहार कसा असावा याचा विचार मी मुख्यतः केला आहे  त्याला अनुसरून नक्की कोणते पदार्थ करावे त्यांच्या अगदी सहजसोप्या अशा पाककृती दिल्या आहेत.  
अशा आहारामुळे वजन हळू हळू पण नक्की आणि कायमचे कमी होईल आणि तसेच टिकेल. आणि अर्थातच खाण्याचा आनंद  समाधानही मिळेल.  
पण असा आहार घेतला तरीही चोर पावलांनी खाण्यात येणारे, म्हणजे सर्व प्रकारचे बेकरीत मिळणारे पदार्थ, चॉकलेटस, मिठाया  इतर गोड पदार्थ, लोणची, आईस्क्रीम्स, तळलेले पदार्थ, फास्ट फूड्स, यांसारखे पदार्थ आपले वजन झपाट्याने वाढवायला कारणीभूत असतात. ते आहारातून पूर्णपणे वर्ज्य केले पाहिजेत.
आणि अर्थातच आटोक्याबाहेर गेलेले वजन कमी करायला केवळ योग्य आहार पुरेसा नाही हे निश्चित. त्याच्या जोडीला नियमीत  योग्य व्यायाम केलाच पाहिजे.

या पुस्तकांतील पाककृती व त्यांमागचा हा विचार नीट समजून घेतला की मी  सुचविलेल्याही हजारो पाककृती तुम्हालाही सहज सुचायला लागतील  त्यामुळेच वजन कमी करणे ही कटकट  वाटता एक अतीशय मजेदार अनुभव वाटेल. असा आहार हा तुमच्या जीवनशैलीचा एक सुंदर  अविभाज्य भाग होईल. 

                   सौ. सुलभा प्रभुणे

No comments:

Post a Comment