OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Planning

आठवड्याचे आहार-नियोजन (आठवड्याचा मेन्यू)
दर आठवड्याला बदलता मेन्यू

·         पती व पत्नी दोघांनाही कामाला जावे लागते व घरातलीही सर्व कामे दोघांनाच करावी लागतात अशा छोट्या कुटुंबांसाठी मुख्यतः हा आहार-नियोजन तक्ता तयार केला आहे. परंतु, वेळ, मनुष्यबळ, सामग्री व पैशांची मर्यादा असलेल्या कोणत्याही कुटुंबासाठी हा उपयुक्त आहे.
·         एकटे राहाणार्‍या (शिक्षणासाठी, नोकरीसाठी, फिरत्या व्यवसायासाठी) व स्वतः स्वयंपाक करावा लागणार्‍यांसाठीही (विशेषतः परदेशात रहाणार्‍यांसाठी) हा तक्ता (काही बदल करून) उपयुक्त आहे.
·         बाहेर जेवावे लागणार्‍यांनी बाहेरच्या खाण्या-जेवणाच्या दोन-तीन वेळा सोडून उरलेल्या वेळांसाठी हा तक्ता वापरावा.
·         या आहार-नियोजनात ६ ते ७ वेळा काहीतरी खाणे गृहित धरले आहे. मुलांसाठी ते आवश्यकच आहे पण मोठ्यांसाठीही ते महत्त्वाचे आहे. फक्त काय खायचे ते मुलांसाठी व मोठ्यांसाठी वेगळे असेल.
·         खाण्याच्या वेळा आपल्या दिनचर्येप्रमाणे बदलाव्या.
·         हा फक्त मार्गदर्शक तक्ता आहे. त्यातील मुख्य तत्वे लक्षात ठेवून त्यात आपल्या गरजेप्रमाणे व पदार्थांच्या उपलब्धतेनुसार बदल करावे.
मुख्य तत्वे व महत्त्व:
  • आठवड्याच्या संतुलित आहाराची कल्पना प्रत्यक्षात आणणे सोपे जाते.
  • रोजचा आहार संतुलित होण्याची शक्यता वाढते.
  • ६-७ खाण्याच्या वेळा व एका खाण्यात संख्येने कमी पण पौष्टिकता वाढवलेल्या पदार्थांचा समावेश.
  • खाद्यपदार्थांच्या व वेळेच्या उपलब्धतेनुसार नियोजन.
  • पक्के व काटेकोर नियोजन पण तरीही बदलाला भरपूर संधी. त्यामुळे रोजच्या आहारात नाविन्य.
नियोजनाचे महत्त्व:
  • सर्वसाधारण नियोजनाचे महत्त्व वेगळे सांगण्याची जरूर नाही.
  • बदललेला जीवनक्रम. विभक्त कुटुंब.
  • मनुष्यबळाची कमतरता - नवरा-बायको दोघेही कामाला जाणार. किंवा एकटे राहावे लागणार.
  • वेळेची, साधन-सामग्रीची व पैशांची कमतरता (वाढती महागाई).
  • वाढते शारीरिक व मानसिक ताण सहन करण्यासाठी पुरेशा, पौष्टिक, व संतुलित आहाराची गरज.  
  • वाढणारी मुले व त्यांच्या वाढत्या गरजा. स्त्रीयांच्या विशेष गरजा.
वेळेचे नियोजन:
  • कोणते पदार्थ कधी करायचे याचा विचार व नियोजन करायला सुट्टीच्या दिवशी पुरेसा वेळ.
  • सामानाची जुळवाजुळव करण्यासाठी पुरेसा वेळ.
  • पूर्वतयारीसाठी (खराब होणार्‍या/न होणार्‍या पदार्थांचे नियोजन, निवडणे, धान्य दळून आणणे, भाजणे, कूट करणे, भाज्या नीट करणे/चिरून ठेवणे, भिजत टाकणे, मोड आणणे, इ.) पुरेसा वेळ.
  • प्रत्यक्ष पदार्थ करण्याच्या व रोजचा स्वयंपाक करण्याच्या वेळेत बचत. (सुधारित पाककृती)
  • अचानक उद्‌भवणार्‍या अडचणी कमी.
  • कामाची विभागणी - नवरा व मुलांना करायला सांगण्याच्या (त्यांच्याजोग्या) कामांचे नियोजन
साधन-सामग्रीचे व आर्थिक नियोजन:
  • उपलब्ध सर्व खाद्यपदार्थांचा उपयोग करणे आणि काहीही वाया न घालवणे.
  • त्या दिवशी स्वस्त मिळणार्‍या व ऋतुमानाप्रमाणे बदलत्या खाद्यपदार्थांचा उपयोग.