OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Thursday, January 20, 2011

बटाट्याचे भरीत



प्रकार:
शाकाहारी  भरीत
थंड

किती जणांसाठी: ४
प्रक्रिया:  उकडणे, कुस्करणे, चिरणे, कालवणे, मिसळणे व फोडणी देणे.
पौष्टिकता:
क्षार
जीवनसत्त्वे
कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ

वेळ:
पूर्वतयारीचा:
१५ मि.
वाढण्याचा:
१ मि.

पाककृतीचा:
३ मि.
खाण्याचा:
२० मि जेवण होईपर्यंत
 
नाव:
बटाट्याचं भरीत
प्रस्तावना:
·         हा झटपट होणारा, हमखास चव आणणारा, कुणालाही आवडू शकणारा, करायला अगदी सोपा व कुणालाही (म्हणून आपल्यालापण) जमण्यासारखा जेवणातला एक पदार्थ आहे.
·         म्हणून एकटं राहणार्‍यांना/असताना हे भरीत उपयुक्त आहे. किंवा आयत्या वेळी करायला हे बायकांनाही उपयुक्त आहे.
·         बायकोला मदत म्हणून, तिला खूष करण्यासाठी, किंवा आपणही काही पदार्थ करू शकतो असं बायकोवर इंप्रेशन मारण्यासाठी नवरा हे करू शकतो. (अर्थात बायकोवर फक्त एकदाच इंप्रेशन पडलेलं असतं. नंतर कधीच पडू शकत नाही.) आपण स्वयंपाकात मदत केल्यामुळं बायकोला सुरुवातीला कौतुक आणि क्वचित कृतज्ञताही वाटू शकते (पण नंतर तिला ही लुडबूड किंवा आपल्या अधिकार-क्षेत्रात ढवळाढवळही वाटू शकते).
·         एरवी बटाट्याच्या पदार्थांचे अनेक पर्याय असल्याने हे भरीत सहसा केलं जात नाही म्हणून हे नाविन्यपूर्णही वाटतं.
·         शिवाय काही बदल करून हे भरीत उपासालाही चालतं.
इच्छा:
तेव्हा आज आपण बटाट्याचं भरीत करूया.  
पूर्वतयारी:
बटाटे उकडून घेणे. भात उकडताना त्याच कुकरमधे टाकले की ते आपोआप उकडले जातात. (संसारात एकात एक अशा अनेक गोष्टी होतात त्यांपैकीच ही एक). इतर सर्व सामानाची मांडामांड बायकोलाच करून द्यायला सांगावी (म्हणजे आपण तिला मदत करतोय का ती आपल्याला?). एकटं राहात असल्यास अर्थात ती आपल्यालाच करावी लागणार.  
तयारी:
आपल्याला एक मोठा कांदा, एक टॉमॅटो, दोन मध्यम आकाराचे (उकडलेले) बटाटे, दाण्याचं कूट (४ चमचे किंवा हवं तितकं), १-२ मिरच्या, कोथिंबीर, एक वाटी दही (थोडं आंबट पण ताजं अन्‌ गोड हवं हं!) आणि फोडणीचं सामान लागेल. 
पाककृती:
·         प्रथम आपण कांदा बारीक चिरून (४*४ मि.मि.) व टॉमॅटोचे मध्यम आकाराचे तुकडे (६*६ मि.मि.) चिरून घेऊ. नंतर मिरचीचे ३ मि.मि. रुंदीचे काप करून घेऊ व कोथिंबीर बारीक चिरून घेऊ.
·         उकडलेले बटाटे सोलून त्याचे १८*१८*१८ मि.मि. आकाराचे तुकडे करून घेऊ. नंतर ते थोडे कुस्करून घेऊ (त्यामुळे आकाराकडे इतकं लक्ष दिलं नाही तरी चालेल).
·         त्यात चिरलेला कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर, दाण्याचं कूट आणि दही घालून चांगलं कालवून घेऊ. शेवटी थोडा मऊपणा, चवीपुरतं मीठ, साखर व मिरचीचे तुकडे घालून मिसळून घेऊ व वरून मोहरी, जिरे, मिरची (अधिक तिखटपणासाठी) व हिंगाची फोडणी देऊ.
·         उपासाचं भरीत करायचं असल्यास त्यात कांदा-टॉमॅटो घातले नाहीत व फक्त जिर्‍याची तुपातली फोडणी दिली म्हणजे झालं.     
समृद्धीकरण
या भरीतात समृद्धीकरणासाठी आपण दाण्याचं कूट व दही घातलेलंच आहे. शिवाय त्यात आपण भिजलेली (कोणतीही) डाळ, नारळाचा कीस, नारळाचं दूध, क्रीम व किसलेलं चीज (यांपैकी उपलब्ध पदार्थ) घालू शकतो.   
कौशल्य:
कांदा व टॉमॅटो चिरताना सध्या बोट कापून न घेता (सुरीने वरून) कापता/चिरता (विळीने खालून) आलं तरी पुरे. आकाराकडे लक्ष नको. वर सांगितल्याप्रमाणे चिरता येण्यासाठी तज्ञ मार्गदर्शन व कमीतकमी १००० तासांचा चिरण्याचा सराव लागतो. बटाटे कुस्कर्ण्याचा सराव आधी महिनाभर करावा. (?). हे भरीत करण्यासाठी बाकी विशेष कौशल्याची जरूर नाही.
सजावट:
फोडणीत थोडी हळद टाकली तर भरीताला छान पिवळा रंग येईल. वर सजावटीसाठी (व थोड्या वेगळ्या चवीसाठी) तळलेला कांदा छान दिसेल.
वाढप:
हे भरीत खोलीतल्या तापमानाला किंवा तासभर फ्रीजमधे ठेवून थंड वाढता येते.
आस्वाद:
दीड वर्षं वयापासून मरेपर्यंत सर्वांना या भरीताचा सर्व वेळी (नाष्ट्याला, जेवताना, मधल्या वेळच्या खाण्याला, आजारपणात, उपासाला, इ.) आस्वाद घेता येतो. 
चिंतन:
·         हा सोपा, चवदार व बहु-उपयोगी पदार्थ आपण नेहमी का करत नाही?
·         यात समृद्धीकरणासाठी आणखी काय घालता येईल?
·         एक पदार्थाचा आहार म्हणूनही हे चालेल.

Thursday, January 6, 2011

M) विशेष आहार 2

याशिवाय आजार आणि विकार यांनुसार विशेष आहार घ्यावे लागतात ते पुढीलप्रमाणे -  
  • पोषक आहार: वजन वाढवणे, तब्बेत सुधारणे, शरीर कमावणे, आजारातून उठताना, इत्यादीसाठी आहार
  • विशेष आजारांसाठी आहार
  • विशेष विकारांसाठी आहार
  • स्थूलपणा: वजन कमी करण्यासाठी आहार
  • मधुमेहासाठी आहार
  • उच्च-रक्तदाबासाठी आहार
  • हृद्‌रोगासाठी आहार
  • मूत्रपिंड-विकार, गाऊट यांसाठी आहार 

    या ब्लॉगवर एखाद्या पाककृतीचे वर्णन करताना आपण शाकाहारी / मांसाहारी,  पाककृती-प्रकार-वर्गीकरण, आहार-वर्गीकरण व वेळ-वर्गीकरण वापरूया. इतर वर्गीकरणासाठी लेबल्सचा वापर करणे सोयीचे होईल. म्हणून आपण एखाद्या पदार्थासाठी त्यातील मुख्य रंग, मुख्य चवी, देश-प्रदेश (देशाचा वेगळा उल्लेख नसल्यास तो पदार्थ भारतीय असेल) व वाढण्याचे तापमान या लेबल्सचा उपयोग करूया.  

M) विशेष आहार 1

वय, लिंग, विशेष गरजा व आरोग्य-पातळी यांनुसार विशेष आहार घ्यावे लागतात ते
पुढीलप्रमाणे -
  • चौरस (संतुलित) आहार
  • मुलांचा आहार: १/२ ते २, २-५, ५-१२ या वयोगटातील मुले
  • पौगंडावस्थेतील मुले-मुली यांचा आहार
  • गर्भारपणातील आहार
  • स्तनपान देतानाच्या काळातील आहार
  • वृद्धापकाळातील आहार

Tuesday, January 4, 2011

L) वेळ-वर्गीकरण

सर्वसाधारणपणे प्रत्येक पदार्थ खाण्याची एक वेळ ठरलेली असते. त्यानुसार केलेले वर्गीकरण पुढीलप्रमाणे
सकाळचा चहा/कॉफी, नाष्टा, सकाळचे जेवण, दुपारचे जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचे खाणे, रात्रीचे जेवण, डिनर. 

K) आहार-वर्गीकरण

एका वेळच्या आहारात/जेवणात किती पदार्थांचा समावेश केला जातो त्यानुसार हे वर्गीकरण केले आहे.ते पुढीलप्रमाणे -
एक-पदार्थ आहार, दोन-पदार्थ आहार, तीन-पदार्थ आहार, चार-पदार्थ आहार (पूर्ण जेवण), पाच-ते-आठ-पदार्थ आहार (पूर्ण जेवण).

J) पाककृती-प्रकार-वर्गीकरण - ३

जेवणातले इतर पदार्थ चटणी, लोणचे, सॉस, पापड, तळण, आणि इतर

J) पाककृती-प्रकार-वर्गीकरण - २

मुख्यतः जेवणातल्या मुख्य पदार्थांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे - 
भाताचा प्रकार, रोटीचा प्रकार, पालेभाजी, फळभाजी, उसळ, आमटी, कोशिंबीर, चटणी-लोणचे, सॉस, गोड पदार्थ (पक्वान्न). 

J) पाककृती-प्रकार-वर्गीकरण - १

सहसा प्राथमिक वर्गीकरण म्हणून हे वापरले जाते.   
इतर वेळच्या खाण्याचे पदार्थ
पेय, सार-सूप, आरंभक (Starters), फरसाण, चटपटा पदार्थ, नाष्ट्याचा पदार्थ, फराळाचा पदार्थ, स्नॅक्स, इ.