OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Saturday, December 4, 2010

टॉमॅटॉचे सार:



प्रकार:
पेय
गरम
किती जणांसाठी: २
प्रक्रिया: उकळणे, कुस्करणे, गाळणे
पौष्टिकता:
थोड्या कॅलरी
क्षार
जीवनसत्त्वे ब, क, अ
अ‍ॅंटी-ऑक्सिडंट्स
वेळ:
पूर्वतयारीचा:
२ मि
वाढण्याचा:
१ मि

पाककृतीचा:
३ मि
खाण्याचा:
१० मि








आज आपण टॉमॅटॉचे सार बनवायला शिकूया. ते चहा बनवण्याइतकंच सोपं आहे.
तात्काळ तरतरी आणायला, थंडी घालवायला, मूड सुधारायला, जिभेला चव आणायला आणि भूक लागायला ते उपयोगी आहे.
पूर्वतयारी:
ते आयतं मिळालं तर ठीकच. पण जिला करायला सांगायचं ती व्यक्तीही दमलेली, काकडलेली आणि मूड गेलेली असेल तर? त्यापेक्षा आपणच ते दोघांसाठी बनवूया.
तयारी:

त्यासाठी आपल्याला १ टॉमॅटो; २ कप पाणी; आलं, लसूण, जिरे, मिरे (किंवा मिरपूड), दालचिनी, लवंग, पुदिना, ओरेगॅनो, बेसिल इ. (यांपैकी कोणतेही २ ते ४ पदार्थ) लागतील. शिवाय पातेलं, झाकणी, गाळणी, सार प्यायला २ बाऊल्स (वाडगी, कप, वाट्या, फुलपात्री किंवा करवंट्यासुद्धा चालतील), २ चमचे (नसल्यास सरळ वाडगा तोंडाला लावून सार पिता येतं) आणि विस्तव (गॅस, स्टोव्ह, शेगडी किंवा शेकोटी) या गोष्टी लागतील.
या सर्व गोष्टी असल्याची खात्री करून आणि त्या योग्य वेळी हाताशी येतील अशी मांडणी करून (हे महत्त्वाचं आहे) मग पाककृतीला सुरुवात करूया.
पाककृती:
गॅस पेटवून त्यावर पातेले ठेवू. त्यात २ कप पाणी उकळण्यासाठी ठेवू. त्यात एका टॉंमॅटोचे बारीक तुकडे, चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर घालून चव घेऊन बघू. नंतर त्यात आपल्याला मिळालेले २-४ मसाल्याचे पदार्थ चिमूट-चिमूट टाकून झाकण ठेवू व पाण्याला उकळी फुटायची वाट बघत (हातांची घडी घालून) स्वस्थ उभे राहू. पाण्याला उकळी फुटताच त्यात थोडी प्रसन्नता, थोडी तरतरी आणि थोड झटका हवा असेल तर १ मिरची (उभी चीर पाडून) किंवा अर्धा चमचा लाल तिखट टकू. मग गॅस बारीक करून झकण ठेवून १ मिनिट उकळूया. (त्यासाठी खोलीत पाच वेळा येरझारा घालू. थोडी वाट बघण्याची सवय आणि जाताजाता व्यायाम).
आता हे सार दुसर्‍या पातेल्यात गाळून घेऊ. (गाळणीतील टॉंमॅटोचे बारीक तुकडे चमच्याने कुस्करून दाबूया.)
कौशल्य:
·          लागणार्‍या सर्व गोष्टी असल्याची आणि त्या योग्य वेळी हाताशी येतील अशी मांडणी केल्याची खात्री करून मग पाककृतीला सुरुवात करूया.
·          प्रत्येक महत्त्वाच्या पायरीनंतर वास आणि चव घेऊया.
·          दुसर्‍या पातेल्यात सार ओतल्यावर त्याल पुन्हा उकळी आणूया.  
सजावट:
दोन वाडग्यांत गरमागरम सार ओतून त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर (केशरी-हिरव्या रंगाची विरोधी रंगसंगती विरोधी असली तरी त्यात संगती आहे) आणि अर्धा चमचा लोणी (आपलं कोलेस्टेरॉल वाढलेलं नाहीये ना?) टाकू.
वाढप:
आता एक वाडगा (मूड बिघडलेल्या) आपल्या खास व्यक्तीला खास शैलीत सादर करूया. या सादर करण्यातच त्या व्यक्तीचा मूड निम्मा सुधारला पाहिजे.
आस्वाद:
सारचा आस्वाद प्रथम खास व्यक्तीला घेऊ दे. तिच्या चेहेर्‍यावर ऊब, तरतरी आणि समाधान दिसलं की आपल्याला दुप्पट समाधान मिळेल.
चिंतन:
·         मसाल्याच्या पदार्थांपैकी २ ते ४ पदार्थ प्रत्येक वेळी निरनिराळे वापरले की तेच सार निरनिराळ्या वेळी वेगळेच लागेल.
·         २-४ मसाल्याचे पदार्थ आपण उपलब्धतेनुसार किंवा मूडनुसार वापरू शकतो.
·         पाण्याऐवजी भाज्यांचे पाणी (व्हेजिटेबल स्टॉक) वापरले तर?
·         त्यात इतर भाज्या बारीक चिरून घातल्या तर?
·         साराला नेहमी (प्रथेप्रमाणे) तूप-जिरे-कढीलिंबाची फोडणी देतात. आपण का नाही दिली? (कारण आपल्याला ती कशी करायची ते माहीत नाही. ते शिकायला हवं.)
·         सार कदाचित अगदी उत्कृष्ट झालं नसेल पण दोघांचाही मूड सुधारला हे काही कमी नाही.
·         दुसर्‍याला झालेला आनंद दिसला की आपल्याला दुप्पट समाधान मिळतं हे इतर कलांइतकंच पाककलेच्या बाबतीतही खरं आहे.

1 comment:

  1. Vaa. Maja aali. Aaej ratri Tomato Soup. As suggest, aayta milnar nasalyane malach banavave lagel. :)

    Watleli Kothimbir Soup ukalatana last min la ghatali tar tyachi vegali aani thodi strong chav yete. That kick is very important if you are making soup at 2 AM in the night after a prolong working session.

    ReplyDelete