OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Friday, February 10, 2012

मिनी इडली कबाब

नाव मिनी डली कबाब, मिनी इड्ली सीख कबाब, मिनी इड्ली व्हेज


प्रकार:

स्नॅक्स, आरंभक, मधल्या वेळचा पदार्थ

गरम

किती जणांसाठी: 4

प्रक्रिया: वाफवणे, हलके तळणे, तळणे

पौष्टिकता:

कर्बोदके,

प्रथिने

स्निग्ध पदार्थ

क्षार, जीवनसत्त्वे

वेळ:

पूर्वतयारीचा:

24 तास, 30 मि आणि 15 मि

वाढण्याचा:

2 मि


पाककृतीचा:

10 मि

खाण्याचा:

10 मि




नाव:

मिनी डली कबाब.

किंवा मिनी डली सीख कबाब, मिनी डली व्हेज, मिनी डली व्हेज टिक्का कबाब, मिनी डली हरिभरी, वाईऽड्ली कबाब, वाई मिनी डली (थाई डीश चालते तर वाई का नाही चालणार?) डली काही-बाही वाई-वाई, डली वाई मीनी (चिकन चाऊ मीनची बहीण), इ.

नावात काय आहे? –असं कुणीतरी म्हटलंय. आपला मतलब चवीशी आणि खाण्याशी. (असं मी म्हणते). ही वरची नावे एकाच पदार्थासाठी सुचवली असली तरी त्या नावांचे वेगवेगळे पदार्थही करता येऊ शकतात ( आम्ही करतो. – त्यांची पाककृती नंतर कधीतरी).

प्रस्तावना:

एखाद्या दिवशी आपल्याला काहीतरी नविन पदार्थ करून बघावासा वाटतो. खूप मस्त मूड आलेला असतो. पण तरीही तो करण्यात तासानुतास घालवावेत असे मात्र वाटत नसते. मग काय करावं बरं? अर्थातच तो पदार्थ टेस्टी आणि हेल्दी तर असलाच पाहीजे. यावर गेल्या शनिवारी मला सापडलेला हा एक सोपा आणि सुटसुटीत उपाय. खरं म्हणजे तो थोडासा उरलेले पदार्थ संपविणे (टातूंटीटाकाऊ तून टिकाऊ किंवा उतूंउ – उरलेल्या तून उपयुक्त) असाही एक प्रयत्न होता.

इच्छा:

पण तो तसा दर वेळी असलेच असा नाही. मुद्दाम ठरवून करायलाही हा तसा अगदी सुटसुटीत चटपटीत चवदारही आहे. मग करू या सुरुवात?

पूर्वतयारी:

डलीचे पीठ तयार मिळतेच. नाहीतर ते घरी बनविणे काही फारसे कठीण नाही. फक्त त्याला आधल्या दिवसापासून नियोजन (Planning) करायला हवे. (24 तास आधी इडलीचा रवा व उडीद डाळ भिजत टाकणे, 8-10 तासांनी वाटणे व 12-16 तास –हवामानाप्रमाणे – फुगू देणे.) मिनी इडलीचा स्टॅड घरात नसेल तरी काहीही बिघडत नाही. आपल्या नेहमीच्याच डल्याही चालतील. त्यांचे हव्या त्या आकारात तुकडे करून घ्या. शेवटी काय? तोंडात गेल्यावर सगळे तुकडेच. (वर पूर्वतयारीत 24 तास इडली पीठ तयार करण्यासाठी व 30 मिनिटे इडल्या करण्यासाठी धरले आहेत. आपल्याला इडल्या करता येतात व छान करता येतात हे गृहीत धरले आहे. इडल्यांची पाककृती नंतर कधीतरी.)

तयारी:

25–30 मिनी इडल्या, सिमला मिरची, गाजर, फ्लॉवर, कोबी, काकडी, बीट, बेबीकॉर्न, उकडलेला बटाटा, (यापैकी जे काही आवडत नसेल ते आधी. नंत जे खूपच आवडते ते अगदी थोडे. कारण ते असेही सारखेच पोटात जाते. पण ह्या मस्त डीशबरोबर आवडणार्‍या भाज्याही कशा गुण्यागोविंदाने पोटात जातात बघा) अशा भाज्यांचे मोठे तुकडे, असल्यास पनीरचे व चीझ्‌चे तुकडे, एका लिंबाचा रस, मिरपूड, टोमॅटो सॉ त्याच्या बरोबर एक मस्त जरा तिखट अशी चटणी हवी (ती खोबरे, कोथिंबीर, पुदीना, मिरच्या,लसूण, आले,या सर्वांची एकत्र वाटून करता येते. वेगळी चटणी ही वापरता येईल). सगळ्यात शेवटी लांब टूथपीक 10-15 हव्यात (आता ह्या पण खायच्या की काय रफेज-फायबर म्हणून? नाही नाही जरा धीर धरा). मग आता सगळी तयारी तर झाली. प्रत्यक्ष करायला सुरुवात करु या?

पाककृती:

· भाज्यांचे तुकडे मिनी डल्या एका बाऊल मध्ये घ्या.

· त्यावर लिंबाचा रस, मिरपू, मीठ घालून थोडा वेळ मुरत ठेवा.

· टूथपीक घेवून त्याला एक इडली, मग एक सिमला मिरचीचा तुकडा, टोमॅटोचा तुकडा, पुन्हा एक डली, गाजराचा तुकडा, चीझ्‌चा तुकडा पुन्हा एक डली, वगैरे या क्रमाने टोचत जा. (जर घरात लहान मुले असतील तर हे काम त्यांनाच करायला सांगावे. म्हणजे काम ही सोपे होईल आणि मुख्य म्हणजे ते त्यांनीच केल्यामुळे नंतरची तयार डीशही ती मजेत खातील).

· आता फ्रायपॅन मध्ये अगदी थोडेसे तेल टाका.त्यावर तयार केलेले 3-4 टूथपीक ठेवून थोडे हलके तळून घ्या.

· सॉस त्यावर टोमॅटो टाका. परत जरा फ्राय करा.

· शेवटी तयार चटणी टाकून मस्त खरपूस भाजा.

समृद्धीकरण

सर्व अन्नघटक एकत्र मिळू शकणारा (One Dish Meal) हा समृद्ध पदार्थ आणखी समृद्ध करण्याची गरजच नाही.

कौशल्य:

· cचांगल्या इडल्या करता येण्याचे कौशल्य इथे गृहीत धरले आहे. (इडल्या विकत आणण्याचा पर्याय आहेच.)

· चटणी करायला विशेष कौशल्याची जरूर नाही.

· आता उपलब्ध भाज्यांचे मोठे-मोठे तुकडे कापायलाही आपल्याला जमत नसेल तर आपण अगदीच कुचकामी आहोत हे जाहीरच करून टाकावे.

सजावट:

· चांगली सौंदर्यदृष्टी असणारा इडली व भाज्यांचे रंग विचारात घेऊनच त्या टूथपिकवर व्यवस्थित मांडून टोचेल.

· त्या हलक्या तळताना त्यावर सॉस व चटणी टाकतानाही जरा वापरली तर वेगळ्या सजावटीची जरूर नाही

· फारतर वाढताना कोथिंबीर व किसलेले चीझ्‍ टाकावे.

वाढप:

एका डीशमधे एकएकच गरमागरम मिनी डली कबाब खायला घ्या. तो संपल्यावर दुसरा वाढा. सगळ्यांना हवे तेवढे मिळतील, तेव्हा हावरटासारखे खाऊ नका, पण एका वेळी एकच मिळेल, हे आधीच सांगा.

आस्वाद:

या डीशमधे प्रत्यक तुकड्याची चव वेगळी लागते. ती नीट समजून घेऊन चव घेत सावकाश आस्वाद घ्या. (गपागपा खाऊ नका. नाहीतर तोंड पोळेल.)

चिंतन:

प्रत्येक गोष्ट खाताना चिंतन करायलाच पाहिजे का? मोकळ्या मनाने फक्त आस्वाद नाही का घेता येत?

राजनने उगीचच खाताना चिंतन वगैरे करायची सवय लावली आहे. चिंतन करायला पाहिजे पण ते दोन खाण्यांच्या मधल्या वेळात किंवा नियोजन करताना किंवा पदार्थ बनवण्यापूर्वी.




1 comment:

  1. Excellent dish. After many days. I imagined pressure cookered boneless chiken in place if idli. I then also imagined aappe. Lastly I imagined pressed cooked rice. But to actually eat this dish of idlya, I shall have to come to Wai. This I shall promptly do - for good nutritional dishes.

    ReplyDelete