OATH

1) Before eating I will pray, “let everyone always have enough food”.

2) I will follow strict hygiene while preparing, serving and eating food.

3) I will prepare and eat food religiously with faith.

4) I will eat only after everybody is served.

5) I will not have any likes, dislikes or complain while eating.

6) I will not leave food in my plate or waste it in any way.

7) I will Eat Religiously with Happiness, Satisfaction and Contentment.

Friday, June 22, 2012

Indian Dessert With Alphonso Touch - हापूस्स्पर्ष हलवा


Indian Dessert With Alphonso Touch
नाव हापूस्स्पर्ष हलवा

प्रकार:
हलवा, गोड पक्वान्न भोजनान्त
गरम, बर्फ-गार
किती जणांसाठी: 8
प्रक्रिया: भाजणे, शिजवणे, कापणे, तुकडे करणे
पौष्टिकता:
कर्बोदके, प्रथिने,
स्निग्ध
जीवनसत्त्व ’अ’
कॅल्शिअम  
वेळ:
पूर्वतयारीचा:
7 मि
वाढण्याचा:
१ मि

पाककृतीचा:
5 मि
खाण्याचा:
१० मि



नाव:
हापूस्स्पर्ष हलवा
प्रस्तावना:
गोड पदार्थ कुणाला आवडत नाहीत? अती गोड खाणं प्रकृतीसाठी अपायकारक असलं (हे आत्ता इथे सांगायची काही गरज होती का?) तरी (मोठ्यांनी मनावर ताबा ठेवून) जेवणाच्या शेवटी थोडं गोड खायला काही हरकत नाही. मुलांनी खायला तर नाहीच नाही. नाहीतरी सगळ्या गोष्टींचा शेवट गोड व्हायलाच हवा ना! तर जेवणाचा शेवट गोड करणारं हे पक्वान्न. शिवाय हे घरी (नवशिक्यालाही) सहज करता येण्यासारखं; पारंपारिक पण नाविन्याचा स्पर्ष असलेलं (Traditional with modern and seasonal touch); सर्वांना आवडणारं, मुलांनी भरपूर खाल्लं तरी चांगलं असं व पौष्टीक पक्वान्न आहे. हे गरम किंवा गारही (बर्फ-गार) छान लागतं.
इच्छा:
आज आपण आपला मित्र व त्याच्या कुटुंबाला जेवायला बोलावले आहे तर आजच आपण हे पक्वान्न करूया.  
पूर्वतयारी:
शेवया घरी करणे (इथपासून तयारी करायची?) किंवा घरगुती शेवया आणणे, बाजारातून अस्सल देवगड / रत्नागिरी हापूस आंबे आणणे (ते नाही मिळाले तर कोणतेही कापून खाण्याचे आंबे किंवा तेही नाही मिळाले तर कोणतेही आंबे चालतील).
तयारी:
2 वाट्या शेवया, 4 चमचे साजुक तूप, 1 लि. दूध, साखर, सुका मेवा (काजू, बदाम, बेदाणे, मनुका), वेलदोड्याची पूड, 2 आंब्याचे बारीक तुकडे (साल व कोय काढून फक्त गराचे तुकडे करावे). रसाचा आंबा असल्यास रस काढावा.
पाककृती:
·         शेवया मंद आचेवर तुपावर फिक्का तपकिरी रंग येईपर्यंत खरपूस भाजाव्या.
·         त्यात दूध घालून आटत ठेवावे.
·         मिश्रण सतत ढवळत त्यात थोडी थोडी साखर घालावी (म्हणजे दूध फुटणार नाही). नंतर यात आंब्याची गोडी वाढणार आहे हे लक्षात ठेवून साखर घालावी.
·         नंतर त्यात स्वादानुसार थोडी वेलदोड्याची पूड घालावी. पण मुख्य स्वाद हापूस आंब्याचाच असणार आहे हे लक्षात ठेवावे.
·         मिश्रण मध्यम घट्ट झाल्यावर ते वाढण्याच्या भांड्यात काढून घ्यावे.
·         त्यात सुक्या मेव्याचे थोडे तुकडे टाकून हलकेच ढवळावे
·         त्यावर आंब्याचे तुकडे पसरावे (किंवा आंबरस घालून हलकेच ढवळावे).
समृद्धीकरण
आटलेले दूध, सुकामेवा व आंब्याचा वापर याशिवाय वेगळे समृद्धीकरण काय हवे?
कौशल्य:
·         शेवया मंद आचेवर सतत एकसारख्या हलवत लक्ष देऊन भाजणे आवश्यक आहे. नाहीतर काही कच्च्या-पांढर्‍या राहातात व काही करपतात (त्यामुळे पक्वान्न वाईट तर दिसतेच पण गिच्च व कडसर-करपट लागते. इतक्या साध्या-सोप्या पदार्थामुळेही आपली लाज जाते व मित्र – मित्र असल्याने व किमान सभ्यतेमुळे – तेव्हा बोलला नाही तरी त्याच्या ते कायम लक्षात राहाते. त्याची मुले चाणाक्ष व चावरी असल्यास, ईऽऽ, काकूंनी आंब्यात कडू गोळे कसले घातलेत’, यांच्या मॅगीत काळ्या आळ्या आहेत’ इ. मुक्ताफळे ऐकावी लागतात.)
·         साखर किंवा आंबरस घालताना दूध फुटू देऊ नये.
·         मिश्रण नंतर घट्ट होत असल्याने आधीच घट्ट होईपर्यंत आटवू नये.
सजावट:
वाढण्यासाठी तयार पक्वान्नावर सुक्या मेव्याने सजावट करावी. पांढरा, फिक्का बदामी, बदामी, तपकिरी व केशरी रंगांची सुरेख संगती व सोपी पण आकर्षक सजावट. (गार वाढायचे असल्यास हे तयार पक्वान्न फ्रीज्‌मधे ठेवावे.
वाढप:
मस्त जेवण झाल्यावर शक्यतो पांढर्‍या किंवा केशरी बाऊल्समधे व सुक्या मेव्याने सजवून याचे वाढप करावे.
आस्वाद:
जेवणानंतर गच्चीत गार वार्‍यात निवांत बसून कौटुंबीक गप्पा मारताना, मुलांचे कौतुक करताना व एकमेकांना सांगताना आस्वाद घेण्यासाठी आंब्याच्या स्वादाचा हा गोड पदार्थ वेगळीच मजा आणतो.  
चिंतन:
·         शेवयांची खीर हा सगळ्यांच्या आवडीचा, पण साधा-सोपा व पारंपारिक पदार्थ आहेच. पण ती पातळ खाल्ली जाते.
·         ती हलव्याइतकी घट्ट केल्याने व त्यात आंब्याचा वापर केल्याने ती जास्त समृद्ध होते आणि तिला वेगळा रंग, वेगळी रंगत व वेगळी मजा येते.
·         थंड खायचा असल्यास त्यावर व्हॅनिला आईस्क्रीम किंवा मॅंगो आईस्क्रीम घालून हा पदार्थ आणखी छान लागतो.
·         आंबा सर्वांच्या आवडीचा तर आहेच पण तो अनेकांगी व अनेक प्रकारांनी उपयुक्त आहे.


आंब्याचा उपयोग केलेली आणखी एक नाविन्यपूर्ण पाककृती लवकरच! आंब्याचा मोसम संपण्याआधी आपल्यापुढे सादर करू. लक्ष ठेवा!! 

No comments:

Post a Comment