याशिवाय आजार आणि विकार यांनुसार विशेष आहार घ्यावे लागतात ते पुढीलप्रमाणे -
- पोषक आहार: वजन वाढवणे, तब्बेत सुधारणे, शरीर कमावणे, आजारातून उठताना, इत्यादीसाठी आहार
- विशेष आजारांसाठी आहार
- विशेष विकारांसाठी आहार
- स्थूलपणा: वजन कमी करण्यासाठी आहार
- मधुमेहासाठी आहार
- उच्च-रक्तदाबासाठी आहार
- हृद्रोगासाठी आहार
- मूत्रपिंड-विकार, गाऊट यांसाठी आहार
या ब्लॉगवर एखाद्या पाककृतीचे वर्णन करताना आपण शाकाहारी / मांसाहारी, पाककृती-प्रकार-वर्गीकरण, आहार-वर्गीकरण व वेळ-वर्गीकरण वापरूया. इतर वर्गीकरणासाठी “लेबल्स”चा वापर करणे सोयीचे होईल. म्हणून आपण एखाद्या पदार्थासाठी त्यातील मुख्य रंग, मुख्य चवी, देश-प्रदेश (देशाचा वेगळा उल्लेख नसल्यास तो पदार्थ भारतीय असेल) व वाढण्याचे तापमान या लेबल्सचा उपयोग करूया.
No comments:
Post a Comment