पुढच्या पिढ्यांच्या आरोग्यासाठी
’मॅगी’सारख्या (सर्वच) प्रॉडक्ट्सवर संपूर्ण बंदी आणली पाहिजे.जगभरात विषारी म्हणून बंदी असलेले पदार्थ आपल्या उत्पादनात वापरणार्या; जाहिरातीच्या माध्यमातून अशी उत्पादने भरमसाठ किमतीला आपल्या माथी मारणार्या; आरोग्यपूर्ण व आरोग्यवर्धक असल्याचा दावा करणार्या; अवाजवी विधाने करणार्या व संपूर्ण उत्पादन-माहीती पॅकेटवर न देणार्या सर्वच बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांवर स्वेच्छेने संपूर्ण बंदी घालण्याची हीच वेळ आहे.
पण स्वतःला उच्च समजणार्या किंवा स्वतःला उच्च वर्गात गणले जावे असे वाटणार्या आपल्यालाच असले फालतू पदार्थ खाण्याचे व आपल्या मुलांना खाऊ घालण्याचे भिकेचे डोहाळे लागले आहेत त्याला कोण काय करणार? हा आपला निष्काळजीपणा आहे, का आपले अज्ञान आहे, का आपले आपल्या मुलांवरचे प्रेम कमी झाले आहे? का हा फक्त घरी स्वयंपाक करण्याचा आळशीपणा आहे?
एकूणच नूडल्स-बिस्किटे-ब्रेड, फ्लेक्स व कोलासारखी तयार पेये यांची आहार म्हणून किंमत शून्य आहे. तर काही उत्पादनांतून महागडी दूध-पावडर (भारतात भरपूर ताजे दूध उपलब्ध असताना) या कंपन्या आपल्या माथी मारत आहेत. बर्याच (विशेषतः बटाटा किंवा मक्याच्या पिठापासून तळून केलेले वेफर्स किंवा कुरकुरीत) पदार्थांत आवश्यकतेपेक्षा खूप जास्त (आरोग्याला अपायकारक होण्याइतके) मीठ व मोनो-सोडियम ग्लुटामेट (अजीनोमोटो) असते.
(बाजारातील सर्व तयार खाद्यपदार्थ, त्यांचे आहारमूल्य, त्यांच्या किंमती, त्यांच्या जाहिराती व त्यांचे खोटे दावे यांसंबंधी बोलायचे तर तो फारच मोठा लेख होईल.)
काही पैशांसाठी अशा उत्पादनांच्या जाहिराती करणारे सिनेस्टार्स व क्रिकेटपटू-खेळाडू आपली विश्वासार्हता व लोकांचे त्यांच्यावरील प्रेम गमावत असतात.
काही वर्षांपूर्वी कॅडबरी चॉकोलेट व कोकाकोलासंबंधीही असेच वाद निर्माण झाले होते. पण आज ते बाजारात सर्वत्र भरपूर उपलब्ध आहेत व गरीब पालकही आटापिटा करून ते आपल्या मुलांना खाऊ घालत आहेत.
अनावश्यक आणि घातक गोष्टींचीच आपल्याला का आणि कशी चटक लागते?
नुकताच "तंबाखू मुक्त दिवस (31 मे)" झाला तसा आता "मॅगी-बू-बोर्न-बिस्किट-फ्लेक्स-कॉम्प्ला-कोक-रस-चॉक मुक्त दिवस" रोज आणि आयुष्यभर पाळायला हवा. स्वतःपुरता स्वेच्छेने आणि सर्वांनी.
तरच पुढच्या पिढ्या आरोग्यपूर्ण होतील व आपल्याला थोड्यातरी माफ करतील.
For the Health of Next Generations
All products like 'Maggi' Should be totally banned.This is the time for Total Voluntary Ban of all products by Giant Multinational Companies. These products contain many toxic and harmful ingredients already banned in developed countries; the Claims about their nutritional advantages are, to say the least, misleading and the product-information is either incomplete or misleading. And all these products are heavily advertised and sold at unreasonably high prices.
But really we cannot blame others. It is our mistake to eat such useless things and at such high prices, (for prestige? to show off? to show that we are modern or forward? or for our ignorance, lack of understanding, lack of our love for our children or just our laziness to prepare healthy food at home?)
As such, Noodles-biscuits-planned foods-cola-drinks are nutritionally useless. In addition, in many complete planned nutritional food-products costly milk powder is added when whole fresh milk is abundantly available in India. Many food products (particularly fried products containing potato or maize powder) also contain excessive salt and substances like Mono-sodium glutamate (Ajinomoto).
(To comment on ALL food products - and all products for that matter - available in the market; their nutritional value; their prices, their advertisements and false claims is beyond the scope of this article. It is a vast subject.)
Cine-stars, cricketers and players loose their credibility and popularity by advertising such overtly useless and hazardous products 'For Few Dollars More'
Few years back, there was similar controversy about Coca-cola and Cadbury chocolate. But now they are freely available in abundance and even poor parents are trying desperately to feed these to their children.
Why and How we get addicted to useless and harmful things?
'No Tobacco Day' was observed recently (31st May) Similarly 'No Maggi-Boo-Bourn-biscuit-flakes-Compla-coke-Ras-choco Day' should be observed everyday for life.
Voluntarily and by All.
Then and then only our next generations will be Healthy and probably pardon us to some extent.
We will try to publish every article in both - Marathi and English - languages.
ReplyDeleteThe Page "Menus" (Weekly Diet Planner Page) was removed from the blog temporarily for Editing. It will reappear soon with modifications, preparations and pre-preparations in simplified form.
Very nice & informative article
ReplyDeleteVery nice & informative article
ReplyDelete