नाव – किवीफ्रूटचा मुरांबा (जॅम)
प्रकार:
|
मुरांबा
|
गार
|
किती जणांसाठी: ?
|
प्रक्रिया: कापणे, मुरवणे, उकळणे
|
पौष्टिकता:
|
थोडे उष्मांक (कॅलरीज्)
|
तंतुमय पदार्थ
|
’क’ (C) ’के’ (K) आणि ’ई’ (E) जीवनसत्त्वे
|
थोड्या प्रमाणात ’बीटा केरॉटीन’
(प्रो-व्हिटॅमिन ए)
|
वेळ:
|
पूर्वतयारीचा:
|
½ तास
|
वाढण्याचा:
|
१ मि
|
|
पाककृतीचा:
|
½ तास
|
खाण्याचा:
|
१० मिनिटे ते ½ तास
|
खरं सुख-समाधान देणार्या कुठल्याच गोष्टी बाजारात
विकत मिळत नाहीत!
नाव:
|
किवीफ्रूटचा मुरांबा (जॅम)
|
प्रस्तावना:
|
·
सध्या
बाजारात नवीन-नवीनच फळे दिसायला लागली आहेत. आत्ता इथल्या बाजारातही ती दिसताय्त
म्हणजे पुण्यामुंबईसारख्या शहरांत तर ती दिसतच असणार. शीतगृहे व थंड पेट्यांतून झटपट
वाहतूक यांची ही कृपा म्हटली पाहिजे. त्यामुळे अगदी परदेशी फळेसुद्धा आता कुठेही
मिळतात.
·
त्यांतील
पीच या फळाची 2 प्रकारची सॅलेड्स आणि जॅम करायला आपण शिकलोच आहेत.
·
तसेच
एक विचित्र आणि वरून अगदी अनाकर्षक; खडबडीत आणि केसाळ; थोड्या मोठ्या
चिक्कूसारखे दिसणारे फळ सध्या बाजारात दिसतंय. हे काय म्हणून विचारलं तर त्याला
किवी म्हणतात असं कळलं. पण हे तर काही पदार्थांत विशेष सजावटीसाठी वापरतात. हे
बाहेरून असं दिसतं? पण चोखोबांनी म्हणूनच ठेवलंय, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा,
काय भुललासी वरलीया रंगा? आणि हे तर फणस, अननस, लिची, चिक्कू यांच्याही बाबतीत
खरं आहेच.
·
पण
याला किवी नाही तर किवीफ्रूट म्हणतात
(किवी नावाच्या न्यूझीलंडमधील पक्ष्यापासून वेगळं ओळखण्यासाठी) किंवा चायनीज
गूजबेरी. (नाहीतरी ओळखता न आलेल्या कशालाही चायनीज म्हणायची आपल्याकडे पद्धत
आहेच. उदा. चायनीज गुलाब, चायनीज आंबा, चायनीज मसले-भात, चायनीज आम्रखंड, चायनीज
शेवयांची खीर वगैरे)
·
पण
हे कापलं की “वा!!!” असाच उद्गार बाहेर पडतो. सुंदर अर्धपारदर्शक चमकदार
हिरव्या रंगाचा गर आणि त्यात बारीक काळ्या बियांची महिरप! (काही जातीच्या
फळांचा गर सोनेरीही असतो म्हणे). म्हणून तर याला सजावटीसाठी वापरतात.
·
हे
खायलाही अगदी सोपं. नुसतं अर्धं कापायचं आणि अगदी पातळ साल सोडून इतर सर्व (बियांसकट)
वाटीतून जेली खावी तसं खायचं. (साल सुद्धा खाता येते पण जरा चोथट व केसाळ
लागते).
·
याची
चव गोडसर आंबट (आंबट संत्र्यासारखी) पण स्वाद अगदीच वेगळा अवर्णनीय असतो.
·
पण
जास्त खाल्लं की तोंडात चुई-मुई असं ते खाजायला लागतं. म्हणूनही याला
अगदी थोड्या प्रमाणात फक्त स्वादासाठी किंवा सजावटीसाठी वापरत असणार.
|
इच्छा:
|
·
नवीन
दिसली म्हणून हौसेनं किवीफ्रूट्स आणली, पण सगळी संपत नाहीत. मग काय करायचं? तर जॅम
करायचा! तो टिकाऊ असतो (पण किती टिकतो ते कळण्याच्या आतच तो संपतो).
·
हा
जॅमही करायला अगदीच सोपा आहे. (जास्त खुलासेवार वर्णनासाठी ”जांभळाचा मुरांबा” बघा)
 
|
पूर्वतयारी:
|
·
मुरांबा
ठेवण्याची बरणी गरम पाण्याने धुवून कोरडी करून ठेवा.
|
तयारी:
|
· 4 किवीफ्रूट
स्वछ धुवून (स्वच्छतेला पर्याय नाही) त्याच्या 4.5 मिलीमीटर जाडीच्या चकत्या कापा.
(हा अनुभव बरं! तुमच्या 5 -5.5 मिमि पर्यंत चालतील).
·
प्रत्येक
चकतीचे 4 तुकडे करा (5 केले तरी चालतील. पण एकसारखे 5 तुकडे कसे करणार? एखादी गोष्ट उगीच अवघड का करायची?)
 
· प्रत्येक
तुकडा चमच्याने कोरून (Scooping) साल काढा. (साल काढण्याची वेगळी पद्धत तुम्हाला माहिती
असल्यास ती वापरली तरी चालेल). (पण साली टाकून द्यायच्या आहेत. आपल्याला तुकड्यांचा जॅम
करायचा आहे, सालींचा नाही, हे लक्षात असू द्या.)
·
तुकडे
बुडतील इतपत साखर घाला. 1 तास मुरत ठेवा.
|
पाककृती:
|
 · आतापर्यंत साखर विरघळून हिरव्या रंगाचा रस सुटलेला असेल. साखरेत मुरलेले तुकडे गॅसवर
ठेवून पक्का पाक होईपर्यंत शिजवा.
·
पूर्ण
गार झाल्यावर संपूर्ण स्वच्छतेची काळजी घेऊन, स्पर्ष न करता (Non-Touch Technique) बरणीत
भरून झाकण घट्ट बंद करा.
·
आता
हे पुढे वर्षभर खायचं नाही (हे शक्य आहे का? उगीच काहीतरी ...)
·
पातेल्याला
चिकटलेला मुरांबा चाटून चव बघा. (शक्यतो पातेल्यात तोंड घालून जिभेनं चाटा. पण
पातेल्यात डोकं अडकणार नाही याची काळजी घ्या. हे करताना केसांना, गालांना, कानांना
पाक चिकटेल. मांजर डोळे मिटून, पंज्यानं डोकं पुसून पंजा चाटतं त्याप्रमाणे हा
पाक चाटा. त्यासाठी मांजरचं बारकाईनं निरीक्षण करावं लागेल. ... किंवा ... ) ... (हे वाक्य जांभळाच्या जॅममधलं जसंच्या तसं कॉपी केलं
आहे.)
|
समृद्धीकरण
|
खाताना
मजेसाठी त्यात थोडं लोणी किंवा (साजुक) तूप घ्यावं. आणखी मजेसाठी (आणि आहाराच्या
दृष्टीनं समृद्धीकरणासाठी) त्यात सुका-मेवा टाकावा.
|
कौशल्य:
|
·
हा
जॅम थोडाच बनवावा व दोन-चार दिवसांत संपवावा. पण टिकाऊपणासाठी अती-स्वच्छतेला
पर्याय नाही.
·
यात
आपण कोणत्याही इतर गोष्टी (टिकवण्याची रसायने, कृत्रिम रंग, कृत्रिम स्वाद व
कृत्रिम चव –आंबटपणासाठी सायट्रीक असीड – इ.) घातलेल्या नाहीत. त्यामुळे हा खाण्यात
कोणताही धोका नाही (मधुमेहाचे रुग्ण व ज्यांना किवीफ्रूटची अलर्जी आहे असे लोक सोडून).
·
ही
पाककृती करताना चव बघण्याची जरूर नाही (ती अप्रतीमच असणार). किवीफ्रूट बर्यापैकी
आंबट असल्याने तुम्हाला हव्या तितक्या आंबट-गोड चवीसाठी कदाचित थोडी साखर घालावी
लागेल.
|
सजावट:
|
काही
जरूर नाही
|
वाढप:
|
मुरांबे
– जॅम कसे खायचे हे सांगायला नकोच.
|
आस्वाद:
|
·
दृष्टीसुख,
स्वादसुख, चाखण्यातली मजा! हंऽऽ टक् !!!
|
चिंतन:
|
·
किवीफ्रूट
खाण्याचे बरेच फायदे आहेत. (उदा. – त्यातील “क”, ई आणि “के” जीवनसत्त्वे) पण फळ कच्चं व भरपूर खाल्लं तरच ते मिळतात.
·
किवीफ्रूटच्या
बियांमधे अल्फा लिनोलेनिक असिड (alpha-linolenic acid) हे
ओमेगा-3 मेदाम्लही (omega-3 fatty acid) असते. पण
त्या बारीक बारीक बिया चावणार कधी आणि कशा? सहसा त्या गिळल्याच जातात आणि
त्यांतील हा उपयुक्त पदार्थ वाया जातो.
·
आणि
(हे परदेशातून – इटली, न्यू-झीलंड, चिली, ग्रीस फ्रान्स, इ. – येत असल्याने)
याची किंमत व अन्न म्हणून त्याचे फायदे यांचा मेळ बसत नाही.
·
याचा
जॅम अप्रतीम लागतो, जेवणाला हमखास चव आणतो, सुंदर दिसतो आणि सजावटीसाठीही वापरता
येतो.
·
अर्थातच
जॅम करण्याच्या प्रक्रियेत त्यांतील जीवनसत्त्वे बर्याच प्रमाणात नष्ट होतात.
·
याचा
इतर कशाबरोबर मुरांबा करता येतो का नाही याचे प्रयोग लेखकांनी केलेले नाहीत.
उत्साही असलेल्यांनी ते जरूर करून बघावेत (व यशस्वी झाले तरच लेखकांना कळवावेत).
·
काहींना
किवीफ्रूटची अलर्जी असते. म्हणून पहिल्यांदाच खाताना ते जपून खावं.
·
किवीफ्रूटमधील
अक्टीनिडीन (Actinidin) या द्रव्यामुळे तोंडात थोडं खाजतं. हाही अलर्जीचा प्रकार असावा. पण या द्रव्याचा उपयोग मांस
नरम करण्यासाठी (कच्च्या पोपईप्रमाणे) होतो. त्यामुळे मांसाच्या मुरवणात
(marinade)
ते वापरता येतं
·
पण
म्हणूनच हे दुधाबरोबर (मिल्क-शेक, आईस्क्रीम, इत्यादींसाठी) वापरता येत
नाही.
·
हे
आपल्याकडचं फळ नसल्यानं व विशिष्ट मोसमातलं असल्यानं जेव्हा मिळेल तेव्हा नक्की
खाऊन बघा. पण आवडलं व अलर्जी नसली तरी हे जास्त खाववत नाही. अशा वेळी मग
मुरांब्यासारखे साठवणीचे पदार्थ करा.
·
डायबेटीस
झालेल्यांनी हे फळ कच्चं खावं. जॅमचं 5 मिनिटं दृष्टीसुख व स्वादसुख घ्यावं आणि एकदाच थोडंसं
(एक थेंब) यम् करावं.
|