S 1 - Hi-Pro Salad - - हाय-प्रो सॅलेड
सुलभा प्रभुणे
आमच्या यूट्यूब चॅनल ’ साकार’ वर पहा - आणि सब्स्क्राईब करा.See on our YouTube Channel 'SAKAR' - and Subscribe.
Salad 1 - Hi-Pro Salad
प्रकार:
|
शाकाहारी सॅलेड
|
थंड
|
किती जणांसाठी: 4
|
प्रक्रिया: मिश्र कडधान्यांना मोड आणणे, वाफवणे / उकडणे /
हलके परतणे, कापणे मिसळणे.
|
पौष्टिकता:
|
क्षार, जीवनसत्त्वे
|
तंतुमय पदार्थ
|
अॅंटी-ऑक्सिडंट्स
|
कर्बोदके व प्रथिने
|
वेळ:
|
पूर्वतयारीचा:
|
15 मि.
|
वाढण्याचा:
|
1 मि.
|
|
पाककृतीचा:
|
5 मि.
|
खाण्याचा:
|
20 मि – जेवण होईपर्यंत, 10 मिनिटं
|
नाव:
|
हाय-प्रो सॅलेड
|
प्रस्तावना:
|
·
हे भरपूर प्रथिनांनी समृद्ध, सर्वांना हमखास आवडणारे, अत्यंत
चविष्ट, आकर्षक, झटपट होणारे व करायला सोपे सॅलेड आहे.
·
शाकाहारी पण आहारात जास्त
प्रथिनांची आवश्यकता असणार्यांसाठी, कमी पण पौष्टीक आहाराची गरज असणार्यांसाठी,
एकटं राहणार्यांसाठी, कंटाळा आलेला असताना किंवा
विशेष जेवणाच्यावेळीही करायला हे छान आहे.
·
बायकोला मदत
म्हणून नवरा हे करू शकतो. किंवा स्वयंपाकात काही न येणार्या नवर्याला बायको हे
करायला (अर्थात देखरेखीखाली) सांगू शकते.
|
इच्छा:
|
तेव्हा
आज आपण हाय-प्रो सॅलेड करूया.
|
पूर्वतयारी:
|
मिश्र कडधान्यांना मोड आणणे. (अर्थात त्यासाठी ती आधी दोन
दिवस भिजत टाकायला लागतात. किंवा, आठवड्याच्या प्लॅनिंगचा भाग म्हणून, आधीच मोड
आणून फ्रीज्मधे ठेवलेली असायला लागतात.) ती हलकी वाफवून किंवा परतून घेणे.
संत्री किंवा मोसंबी सोलून ठेवणे, शेंगदाणे भाजून घेणे
|
तयारी:
|
आपण 2 वाट्या मोडाची
कडधान्ये आणि 1 वाटी सोललेल्या मोसंब्याचे तुकडे घेऊ. शिवाय
आपल्याला अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी अक्रोडाचे तुकडे, पाव वाटी क्रॅनबेरीज्, आले-हिरव्या मिरचीचा ठेचा/लाल तिखट, चाट मसाला, कोथिंबीर,
मीठ आणि लिंबाचा रस लागेल.
|
पाककृती:
|
·
प्रथम आपण एका
पातेल्यात वाफवलेली कडधान्ये आणि पाऊण वाटी मोसंब्याचे तुकडे घेऊ.
·
त्यात भाजलेले शेंगदाणे, अक्रोडाचे तुकडे, क्रॅनबेरीज् (सजावटीसाठी
सर्व थोडे थोडे वगळून), थोडी कोथिंबीर आणि आपल्या तिखटपणाच्या आवडीनुसार आले-हिरव्या
मिरचीचा ठेचा/लाल तिखट घालून मिसळून घेऊ. डाळिंबाचे दाणे, आले-हिरव्या मिरचीचा
ठेचा/लाल तिखट आणि थोडी कोथिंबीर घालू.
आता त्यात चवीपुरतं
मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून सगळे नीट मिसळून घेऊ. हाय-प्रो सॅलेड तयार.
|
समृद्धीकरण
|
हे सॅलेड
आधीच भरपूर समृद्ध आहेच. यात आणखी काही घालण्याची जरूर नाही.
|
कौशल्य:
|
हे करण्यासाठी कोणत्याही विशेष कौशल्याची जरूर नाही.
|
सजावट:
|
रंगसंगतीमुळे हे आधीच छान आणि आकर्षक दिसते.
परंतु शेवटी हे सॅलेड बाऊलमधे काढून घेऊन मोसंब्याचे तुकडे, भाजलेले शेंगदाणे, अक्रोडाचे तुकडे आणि क्रॅनबेरीज् यांनी सजवू..
|
वाढप:
|
वाढताना उभ्या छेदाने वाढले म्हणजे मला कमी मोसंब, याला
जास्त अक्रोड अशी (मोठ्यांचीही) भांडणे होत नाहीत आणि कोणाला त्यागही करायला
लागत नाही.
|
आस्वाद:
|
चांगले चावता येण्याच्या (3 वर्षे) वयापासून चांगले चावता
येण्याच्या (कवळीसह) वयापर्यंत सर्वांना या सॅलेडचा आस्वाद घेता येतो. आणि
अर्थातच ते सर्वांना आवडतेच.
|
चिंतन:
|
·
हा सोपा, चवदार
व बहु-उपयोगी भरपूर प्रथिनयुक्त पदार्थ आपण नेहमी करायला हवा.
·
वाढत्या वयाची मुले, गर्भार
आणि अंगावर पाजणार्या स्त्रिया, इत्यादी आहारात जास्त प्रथिनांची आवश्यकता असणार्या पण शाकाहारी असणार्यांसाठी हे सॅलेड फार
छान आहे.
·
मोडाची कोणतीही
कडधान्ये आपण त्यात वापरू शकतो. (मोडाची कडधान्ये – घरी मोड आणलेले असल्यास –
कच्चीही खाता येतात.)
·
संत्र-मोसंब्याच्या
ऐवजी आपण सीझनप्रमाणे त्यात (काळी) द्राक्षे, किंवा स्ट्रॉबेरीज् घालू
शकतो.
·
सर्व वेळी
(नाष्ट्याला, जेवताना, मधल्या वेळच्या खाण्याला, आजारपणानंतर, इ.), सर्व वयाच्या
लोकांना खायला हे छान आहे. फार भूक नसताना किंवा हलका पण संपूर्ण, एक पदार्थाचा आहार
(वन डिश मील) म्हणूनही हे छान आहे.
·
मधुमेह,
रक्तदाब किंवा हृद्रोग असलेल्यांसाठी हे (जेवणाऐवजी) उत्तम आहे.
·
हे खूप चावून
खावे लागत असल्याने जेवणाचा वेग मंदावतो व त्यात भरपूर तंतुमय पदार्थ असल्याने
पचनाचा वेगही मंदावतो (मधुमेही लोकांसाठी व वजन घटवण्यासाठी हे आवश्यक आहे).
शिवाय जाताजाता सकाळी O.K.
·
“सावकाश खा,
कच्चे खा व (नैसर्गिक) रंगीत खा” हे आरोग्यपूर्ण आहाराचे
तत्व हे या सॅलेडमधे सहजच पाळले गेले आहे. आणि चवदार तर हे आहेच! पण पौष्टीकही
आहे. पौष्टीक नसेल तर चवीचा काय उपयोग?
|

No comments:
Post a Comment