नाव – चीझ्-पनीर रश्शातील तळलेली भेंडी
प्रकार:
|
घट्ट रस-भाजी
|
गरम
|
किती जणांसाठी: 8
|
प्रक्रिया: चिरणे, तळणे/परतणे, फोडणी करणे, उकळणे, मिसळणे.
|
पौष्टिकता:
|
प्रथिने, स्निग्ध पदार्थ
|
कर्बोदके,
|
जीवनसत्त्वे – “अ”, “ब” व “क”
|
क्षार, विद्राव्य व अविद्राव्य तंतुमय पदार्थ
|
वेळ:
|
पूर्वतयारीचा:
|
30 मि
|
वाढण्याचा:
|
1 मि
|
|
पाककृतीचा:
|
10 मि
|
खाण्याचा:
|
15 ते 30 मि
|
नाव:
|
चीझ्-पनीर रश्शातील तळलेली भेंडी
|
प्रस्तावना:
|
·
‘आंबरसाच्या रश्शातील भेंडी फ्राय’ चाखून झाल्यावर त्याच परंपरेतील / ...
परंतु सर्वस्वी वेगळ्या चवीची, वेगळ्या स्वभावाची ही डिश चाखून पहा.
·
भेंडीच्या दिवसांत
बाजारात बर्याच वेळा फक्त भेंडी/गवार/दोडके एवढ्याच भाज्या उपलब्ध असतात आणि
रोज तेच्तेच खायचा कंटाऽऽऽळा येतो. त्यावेळी ही
भाजी करावी. पण म्हणूनच फक्त ही करावी असं नाही. ‘आंबरसाच्या रश्शातील भेंडी फ्राय’ इतकीच ही भाजीही फारच विशेष व गुणसंपन्न आहे. हीही तुम्ही तुमच्यासाठी, मुलांसाठी व पाहुण्यांसाठीही मुद्दाम
करणारच.
·
सहसा सर्वांना आवडते
म्हणून खास ‘भेंडी फ्राय’ ही भाजीही लग्न-जेवणे व इतर विशेष मेजवानीच्या प्रसंगी हमखास असते. पण ती (तेलकट,
पचपचीत, मिचमिचीत, गिळगिळीत) वेगळी!
|
इच्छा:
|
तर अशी रंगीत, आकर्षक,
रंगतदार, चवदार व समृद्ध चीझ्-पनीर रश्शातील तळलेली भेंडी आपण आज करूया.
|
पूर्वतयारी:
|
आंबरस काढून ठेवण्याशिवाय इतर सर्व पूर्वतयारी
‘आंबरसाच्या रश्शातील तळलेली भेंडी’ या पाककृतीप्रमाणेच आहे. त्यामुळे याच ब्लॉगवरील ती पाककृती पहा व
त्याप्रमाणे उभी चीर दिलेले भेंडीचे तुकडे करून घ्या.
|
|
आपण 100 ग्रॅम चीझ् (बारीक तुकडे करून), 100 - 150 ग्रॅम पनीर
(बारीक तुकडे करून), 1 किलो उभी चीर दिलेल्या भेंड्या, 4
उभी चीर दिलेल्या हिरव्या मिरच्या, 2 चमचे लाल तिखट, फोडणीचे सामान (6 चमचे तेल,
1 चमचा
मोहरी, 2 चमचा जिरे, हळद व हिंग), 4 चमचे साजूक तूप, 2 लवंगा 8 काळे
मिरे, १ इंच दालचिनी तुकडा, २ टॉमॅटॉ – बारीक चिरून, ४ मोठे चमचे दही (किंवा सायीचे
दही/फ्रेश क्रीम), अर्धा चमचा साखर, मीठ (चवीनुसार) व बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊ.
|
पाककृती:
|
·
आमच्या पद्धतीने ‘भेंडी फ्राय’ करा (कृती: ‘आंबरसाच्या रश्शातील तळलेली भेंडी’ या पाककृतीतील ‘भेंडी फ्राय’च्या कृतीप्रमाणेच) व फ्राय-पॅनमधून बाहेर काढा.
·
त्याच फ्राय-पॅनमधे
उरलेल्या तेलात 4 चमचे साजूक तूप, १ चमचा हळद, जाडसर मिरपूड, लवंगा व दालचिनी
टाका.
·
त्यात टॉमॅटॉचे तुकडे
टाकून परता.
·
४ मोठे चमचे दही व
पनीरचे तुकडे टाका. जरुरीपुरते पाणी, अर्धा चमचा साखर व चवीपुरते (रश्शापुरेसे)
मीठ टाकून ढवळा.
·
उकळी आल्यावर त्यात
चीझ्चे तुकडे टाकून उकळी येऊद्या.
·
त्यात तळलेली भेंडी व
कोथिंबीर (चिरलेल्यापैकी निम्मी) हलकेच टाकून अलगद ढवळा (रस भेंडीला लपेटेपर्यंत)
व उकळी येऊद्या (फक्त 1 मिनिट). चव घेऊन बघा. थोडा आणखी आंबटपणा हवा असल्यास
लिंबू पिळा.
·
गॅस बंद करा व गरमागरम
लगेच वाढा. वाढण्यापूर्वी वरून उरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
|
समृद्धीकरण
|
·
चव-स्वाद, रंग-रूप व
पौष्टीकपणाच्या दृष्टीने ही मुळातच इतकी समृद्ध आहे की जादा समृद्धीकरणाची जरूर नाही.
·
(अती लाडाने लठ्ठ व
मठ्ठ न झालेल्या) मुलांसाठी व इतर खाणार्यांच्या (स्वतःसकट) प्रकृतीनुसार जादा
चीझ् व पनीर तुम्ही कितीही घालू शकता.
·
हवे असल्यास (उगीचच)
तुम्ही काजू-बदामही घालू शकता. पण त्यापेक्षा अक्रोडाचे तुकडे घालून पहा.
|
कौशल्य:
|
·
हा इतका उत्कृष्ट पदार्थ
अगदी नवशिक्यालाही करायला अगदी सोपा आहे. शिवाय तो (पूर्वतयारीचा वेळ सोडता)
अगदी झटपटही होतो. पण ...
·
भेंडीचे एकसारख्या
लांबीचे तुकडे करणे; तिला उभी चीर पाडणे; रंग सांभाळणे योग्य प्रमाणात शिजवणे व
लगदा होऊ न देता ढवळणे इत्यादी कौशल्यांसाठी पहा – ‘आंबरसाच्या रश्शातील तळलेली भेंडी’
·
शेवटी चव ३-४ वेळा बघून
चवींचा सुयोग्य मेळ जमवणे अर्थातच आवश्यक आहे. कशातही आणि कितीही चीझ्-पनीर
घातलं की पदार्थ चांगलाच होतो हा गैरसमज आहे.
|
सजावट:
|
पिवळ्या-पांढर्या, मधेच लालसर (टॉमॅटॉमुळे) चमकदार रश्शात चमकदार हिरव्या भेंड्या व हिरवी कोथिंबीर अशी विरोधी रंगसंगती असलेला या आकर्षक पदर्थाला वेगळ्या सजावटीची गरज नाही.
|
वाढप:
|
ही भाजी झाल्या झाल्या लगेच गरमागरम वाढून
जेवायला सुरुवात करावी.
|
आस्वाद:
|
·
निम्म्या लोकांना, धीर
धरवत नाही. कधी खाऊ असं होतं.
·
पण जे पहिल्यांदाच
खाणार त्यांनी धाडस करून पहिला तुकडा तोंडात टाकला की वाऽऽऽ!
·
एकदा खाल्यावर मात्र हा
पदार्थ पुन्हा-पुन्हा, बोटं चाटत, नुसताच सारखा खावासा वाटतो.
·
पण हा अर्थातच पोळी,
पराठा, भाकरी, ब्रेड व भाताबरोबरही छानच लागतो.
·
शेवटी फ्राय-पॅन
चाटायला ज्याला मिळते तो खरा भाग्यवान.
|
चिंतन:
|
·
चीझ्-पनीर रश्श्यात दह्याऐवजी आपण सायीचे दही किंवा ताजे क्रीम
वापरू शकतो.
·
आत्ता आपण केलेल्या रश्श्यात
गोड चवीचा समावेश नाही. पण साखर/मध वापरून आपण तो कमी-अधिक गोडसर चवीचाही बनवू
शकतो.
·
कांदा-लसूण-आले;
कोथिंबीर-पुदिना, लवंग-दालचिनी-मध; ओरेगानो-थाईम-बेसिल; गरम मसाला किंवा
मटण-मसाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादांचाही (स्वाद-मेळ
– आगामी लेख) आपण वापर करू शकतो.
·
या प्रकारच्या चीझ्-पनीर
रश्श्यात आपण भेंडीऐवजी बटाटा, कॉली-फ्लॉवर, श्रावण-घेवडा, गवार, दोडका,
तोंडली, पडवळ, भोपळा, दुधी भोपळा, गाजर, बीट (पण बीट्च्या रंगानं सगळंच लाल
होतं व गाजर-बीट वगैरे शक्यतो कच्चंच खावं हे लक्षात ठेवावं) आणि अगदी कार्लीसुद्धा
घालू शकतो. तसेच अर्थातच चिकन, कोळंबी किंवा पापलेट-सुरमईचे बोनलेस तुकडे.
·
अशा पदार्थांचा उपयोग
अर्थातच फसवून कमी आवडीच्या किंवा दुर्लक्षित (पण आरोग्यदृष्ट्या चांगल्या) भाज्या
व इतर पदार्थ खायला घालण्यासाठी करता येतो व नेहमीच (चांगल्यासाठी) करावा.
·
नुसती साधी ‘भेंडी फ्रायही’ तुम्ही आमच्या पद्धतीनं करून बघा. ती
दिसायला जास्त आकर्षक, जास्त चवदार, जास्त समृद्ध व जास्त आरोग्यपूर्ण आहे.
|
Caesars Palace Review: The City of Luxury - DrMCD
ReplyDeleteCaesars 서귀포 출장샵 Palace 거제 출장샵 is a luxury hotel and casino 광주 출장샵 on the Thames in New 전라남도 출장샵 London. Built in 2008, the lavish 광주 출장안마 hotel is designed to showcase the